ओव्हरहेड तारांच्या देखभालीकडे दुर्लक्ष Print

प्रतिनिधी, मुंबई
ओव्हरहेड तारांची योग्य देखभाल होत नसल्यामुळेच त्यांच्यावर ताण येऊन त्या तुटत असल्याचे बुधवारच्या मध्य रेल्वेवरील ऐन गर्दीच्यावेळी झालेल्या गोंधळातून स्पष्ट झाले आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील सततच्या वाहतुकीमुळे ओव्हरहेड तारांची देखभाल नियमित करणे शक्य नसल्याने असा प्रकार घडल्याचे  वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.