अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या Print

प्रतिनिधी, मुंबई
वारंवार बजावूनही दुसऱ्याच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. मुंबई सेंट्रल पोलिसांनी या प्रकरणी मोहम्मद हुसेन चांद शेख याला अटक केली आहे. भंगार विक्रीच्या व्यवसाय करणाऱ्या बशीर हुसेन सय्यद याचे माहिम येथे राहणाऱ्या एका महिलेशी अनैतिक संबंध होते. तिचा पती मोहम्मद चांद हुसेन याने सैय्यदचा काटा काढण्याचे ठरवले. त्यानुसार त्याने दोन मित्रासंह सैय्यदची हत्या केली.