मैत्रिणीवर रसायन फेकणारा अद्याप फरारी Print

प्रतिनिधी, मुंबई
मैत्री तोडल्याने संतप्त होऊन मैत्रीणीवर रसायन फेकून तिला जखमी करणारा हल्लेखोर पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. जेरी जॉन(४५) असे या आरोपीचे नाव आहे.    बुधवारी पहाटे वरळीच्या आदर्शनगर येथे ही घटना घडली होती. आर्याका होस्बीटकर (२७) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचे नाव असून तिच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आर्याका फिजिओथेरेपिस्ट असून तिची जेरी जॉनशी गेल्या १० महिन्यांपासून मैत्री होती. दोघेही एकाच सायकल ग्रुपमध्ये होते. हा ग्रुप सायकलींवर रात्री मुंबईत भटकंती करायचा. मात्र जॉन विवाहीत असल्याचे समजल्यानंतर आर्याकाने त्याच्याशी मैत्री तोडली होती. त्यामुळे जॉन संतप्त झाला होता.