सोहराबुद्दिन चकमक: आज मुंबईत सुनावणी Print

प्रतिनिधी, मुंबई
गुजरातमधील सोहराबुद्दिन बनावट चकमकीप्रकरणी गुजरातचे आमदार अमित शहासह १८ आरोपींना मुंबईच्या मुख्य महानगरदंडाधिकाऱ्यांनी समन्स बजावले असून शुक्रवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. २००५ साली गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने गांधीनगर येथे बनावट चकमकीत सोहराबुद्दिन आणि त्याची पत्नी कौसरबी हिला ठार केले होते, असा आरोप आहे. याप्रकरणी अमित शहा यांच्यासह एकूण १८ आरोपींना केंद्रीय अन्वेषण विभागाने आरोपी बनवत त्यांच्यावर गुजरातमधील स्थानिक न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले होते.