‘त्या‘ कंपन्या बनावट असल्याचा प्राप्तिकर खात्याचा अहवाल Print

गडकरी भ्रष्टाचार आरोप प्रकरण
प्रतिनिधी, मुंबई
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या पूर्ती उद्योग समूहातील मुंबईत नोंदणी झालेल्या कंपन्यांची चौकशी प्राप्तिकर खात्यामार्फत करण्यात येत आहे. या चौकशीत काही कंपन्या बनावट असल्याचे आढळून आले आहे.
सर्वेक्षणात प्राप्तिकर विभागाला काही कंपन्यांचे लेखा अहवालही सापडले आहेत. मुंबईत नोंदणी करण्यात आलेल्या या कंपन्या फारच अल्प भांडवल गुंतवून स्थापन करण्यात आल्याचे तसेच या कंपन्यांचे संचालक वारंवार बदलण्यात आल्याचेही या तपासात निष्पन्न झाले. बेहिशेबी पैसा मुख्यत्वे कोलकाता आणि नागपूर येथून वापरण्यात आला आहे, असेही प्राप्तिकर खात्याला आढळून आले आहे. याप्रकरणी संचालकपदी असणाऱ्या १२ व्यक्तींचे जबाब नोंदवून पुण्याला पाठविण्यात आल्याचे प्राप्तिकर विभागाने प्राथमिक अहवालात म्हटले आहे.