काँग्रेस नगरसेवकाला अटक Print

प्रतिनिधी, मुंबई
वनजमिनींचे सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी समता नगर पोलिसांनी काँग्रेसचे नगरसेवक योगेश भोईर यांना अटक केली. त्यांची जामिनावर सुटका झाली आहे.
गोरेगावच्या समतानगर परिसरात जामुन पाडा येथील जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी वनाधिकारी गेले होते. येथील रहिवाशांचा त्याला विरोध होता. त्यामुळे प्रभाग क्रमांक २४ चे नगरसेवक योगेश भोईर तेथे गेले. त्यांनी अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून हे सर्वेक्षण करण्यापासून रोखले. त्यामुळे वनअधिकाऱ्यांनी समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी भोईर यांच्यावर गुन्हा नोंदविला.