जोगेश्वरीत तीन हजार किलो भेसळयुक्त मावा हस्तगत Print

प्रतिनिधी, मुंबई
गुन्हे नियंत्रण शाखेने गुरुवारी जोगेश्वरीत तब्बल तीन हजार किलो बनावट मावा जप्त केला आहे. त्याची किंमत अंदाजे पाच लाख एवढी आहे. अग्रवाल मिल्क प्रॉडक्टवर हा छापा घालण्यात आला. त्याचे नमुने अन्न व औषध प्रशासनाकडे पाठविल्याचे पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी सांगितले.