अक्षय, ट्विंकलविरुद्ध अनिता अडवाणीची याचिका Print

प्रतिनिधी, मुंबई
दिवंगत अभिनेता राजेश खन्ना याची कथित घनिष्ट मैत्रीण अनिता अडवाणी हिने अभिनेता अक्षयकुमार व त्याची पत्नी ट्विंकल यांच्यासह खन्ना कुटुंबातील चौघांना कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत न्यायालयात खेचले आहे. तसेच आपल्याला ‘आशीर्वाद’मध्ये प्रवेश मिळावा आणि देखभालखर्च मिळावा यासाठी अशी मागणी केली आहे.
वांद्रे महानगरदंडाधिकाऱ्यांनीही या तक्रारीची  दखल घेत डिंपल, अक्षय, ट्िंवकल यांना नोटीस बजावून २७ नोव्हेंबपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. राजेश खन्ना यांच्यासह आपण काही वर्षे वांद्रे येथील आशीर्वाद बंगल्यात राहात होतो आणि उतारवयात खन्ना यांची देखभाल करीत होतो, असा तिचा दावा आहे.