गिरणी कामगारांना कागदपत्रे जमा करण्यासाठी मुदतवाढ Print

प्रतिनिधी, मुंबई
गिरणी कामगारांच्या घरांसाठी ‘म्हाडा’ने काढलेल्या सोडतीत घरे मिळालेल्या यशस्वी अर्जदारांना कागदपत्रे जमा करण्यासाठी ऑक्टोबरची मुदत असताना अद्याप ७५४ अर्जदारांची कागदपत्रे जमा झालेली नाहीत. त्यामुळे कागदपत्रे जमा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून १६ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ती जमा करता येतील.
म्हाडातर्फे ६९२५ घरांसाठी जूनच्या अखेरीस सोडत काढण्यात आली होती. यशस्वी अर्जदारांना घर मिळाल्याबाबतचे सूचनापत्र पाठवणे आणि त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रे गोळा करण्याचे काम मुंबै बँकेला सोपवण्यात आले. मात्र, ७५१ अर्जदारांनी अद्याप कागदपत्रे जमा केलेली नाहीत.
या पाश्र्वभूमीवर यशस्वी अर्जदारांना कागदपत्र जमा करण्यासाठी आणखी काही दिवस मिळावेत म्हणून १६ ते ३० नोव्हेंबपर्यंतचा अवधी वाढवून देण्यात आला आहे.