पाण्यावरून संघर्ष Print

मराठवाडय़ाविरोधात नगर-नाशिक
खास प्रतिनिधी, मुंबई
पाण्यावरून आजवर राज्या-राज्यांमध्ये वाद होत असले तरी आता राज्यांतर्गतच मराठवाडा विरुद्ध नगर-नाशिक असा मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. राज्य मंत्रिमंडळातच या प्रश्नावरून दोन गट पडल्याने गुरुवारी जलसंपदा मंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे आता १७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत अंतिम  तोडगा निघेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
मराठवाडय़ासाठी अहमदनगर जिल्हय़ातील भंडारदरा-निळवंडे धरणामधून यापूर्वी अडीच टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. मात्र अजून १८ टीएमसी पाणी सोडण्याचा आग्रह मराठवाडय़ातील नेत्यांनी धरला असून काल मंत्रिमंडळ बैठकीत य प्रश्नावर बरीच वादावादी झाली.