विमानात गोंधळ घालणाऱ्या शेखला जामीन Print

पीटीआय, नवी दिल्ली
मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात गोंधळ घालणाऱ्या मुंबईच्या मुरसालिन शेख या प्रवाशाची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. शेख याच्या वकिलांनी तो मानसिक रुग्ण असल्याची कागदपत्रे दाखल केली. त्याची दखल घेत न्यायालयाने त्याला जामीन दिला. जुन्या कारच्या विक्रीचा व्यवसाय करणारा शेख ७ नोव्हेंबरला म्हणजे बुधवारी विमानप्रवासामध्ये हिंसक झाला. कर्मचाऱ्यांवर हल्ला करत विमान खाली उतरविण्याची धमकी दिली होती. जबरदस्तीने कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेखला एअर होस्टेससह अन्य कर्मचाऱ्यांनी रोखले होते. या वेळी शेखने एअर होस्टेसला थप्पड मारण्याचाही प्रयत्न केला होता. विमान इंदिरा गांधी विमानतळावर उतरल्यावर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.