अंबरनाथ पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट Print

प्रतिनिधी, ठाणे
अंबरनाथ नगरपालिकेतील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सहा हजार शंभर रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय नगरसेवकांनी शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत घेतला. या निर्णयामुळे पालिकेच्या तिजोरीवर सुमारे ७० लाखांचा बोजा पडणार आहे.
नगरपालिका आणि शिक्षण मंडळामधील एकूण एक हजार ६३ अधिकारी तसेच कर्मचारी आहेत. दिवाळी तोंडावर येऊन ठेपलेली असतानाही नगरपालिकेने कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाबाबत निर्णय घेण्यात आला नव्हता. दरम्यान, शुक्रवारी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी तातडीची सभा घेतली, त्यामध्ये सानुग्रह अनुदानासंदर्भात निर्णय घेण्यात आला.