मुंबई-दिल्ली वातानुकूलित गाडीच्या दहा विशेष फेऱ्या Print

मुंबई- मुंबई आणि नवी दिल्लीच्या दरम्यान वातानुकूलित सुपरफास्ट गाडीच्या दहा विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. १२, १५, १८, २१ आणि २४ नोव्हेंबर रोजी मुंबई ते नवी दिल्ली दरम्यान ही गाडी चालविण्यात येणार असून ११ नोव्हेंबरपासून या फेऱ्यांचे संगणकीकृत आरक्षण सुरू करण्यात येणार आहे. सकाळी ११.१५ वाजता ही गाडी मुंबई सेंट्रल येथून सुटणार आहे. नवी दिल्ली येथून १४, १७, २०,२३ नोव्हेंबर रोजी ही गाडी मुंबईसाठी सुटेल येथे पोहोचेल.