मनोहर जोशी रुग्णालयात Print

विशेष प्रतिनिधी , मुंबई

शिवसेना नेते मनोहर जोशी यांची प्रकृती बिघडल्यामुळे शुक्रवारी दुपारी त्यांना दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.मनोहर जोशी यांना मूत्रमार्गातील बिघाडामुळे सुश्रुशा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आवश्यक त्या चाचण्या झाल्यानंतर एक-दोन दिवसात त्यांना घरी पाठविण्यात येणार आहे.