सावत्र बहिणीला विकण्याचा डाव उधळला Print

खास प्रतिनिधी ,नवी मुंबई
बांगलादेशाहून मुंबईत आणलेल्या आपल्या सावत्र बहिणीला एक लाख वीस हजार रुपयांना विकताना नवी मुंबई खंडणीविरोधी पथकाने तळवली गावातून एका त्रिकूटाला अटक केली.
अब्दुल सत्तार, जसिम शेख, आणि मोमिन शेख अशी या आरोपींची नावे असून विकली गेलेली तरुणी ही अब्दुलची सावत्र बहिण आहे. कोपरखैरणे येथील एका लॉजमध्ये या मुलीचा सैदा करताना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी हा सापळा रचला होता.