कचरापेटीत सापडला तरुणीचा मृतदेह Print
मुंबई, १२ जून / प्रतिनिधी
एका २५ वर्षे वयाच्या तरुणीचा मृतदेह गोरेगावमधील हब मॉलजवळच्या कचरापेटीत सापडल्यामुळे खळबळ माजली आहे. पत्र्याच्या पेटीत हा मृतदेह ठेवण्यात आला होता. प्रचंड उष्म्यामुळे मृतदेहाची कातडी सोलून निघाली होती. सुस्थितीतील या तरुणीची हत्या दोन-तीन दिवसांपूर्वी करून तिचा मृतदेह कचरापेटीत टाकून देण्यात आला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. तिचा मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठविण्यात आला आहे.