जनरल नॉलेज: देशी व विदेशी Print
’ लखन रामकुवर अग्रवाल ,बुधवार, २२ डिसेंबर २०१०
संपर्क- ९८२२७१२१०१.

सन २०३२ पर्यंत देशात एकूण किती अणुऊर्जा पार्क स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे?
    -पाच अणुऊर्जा पार्क
ऑक्टोबर २०१० मध्ये पार पडलेल्या १९ व्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतातर्फे सर्वाधिक सुवर्णपदक या खेळाडूने जिंकले.
    - गगन नारंग
सन २०११ मधील १० वे अखिल भारतीय नाटय़संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे?
    - रत्नागिरी
फ्रान्स सरकारतर्फे दिला जाणारा ‘फ्रान्स सर्वोच्च नागरी पुरस्कार’ हा कोणत्या भारतीय व्यक्तीस देण्यात आला?
    - पंडित हरिप्रसाद चौरसिया
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था (नासा) अंतराळवीरांना यानाद्वारे मंगळग्रहावर नेऊन सोडणार आहे, या मोहिमेचे नाव काय?
    - हंड्रेड एअर स्टारशिप
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सर्वश्रेष्ठ खेळाडूचा ‘डिक्सन’ पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
    - ट्रेसिया स्मिथ (जमैका)
चीन येथे पार पडलेल्या १६ व्या एशियाई स्पर्धेचे घोषवाक्य काय होते?
    - थ्रिलिंग गेम्स, हार्मोनियस एशिया
सन २०१० चा एशियाई सर्वश्रेष्ठ वित्तमंत्रीचा पुरस्कार कोणास देण्यात आला आहे?
    - प्रणव मुखर्जी
देशातील कोणत्या राज्याचे घरेलू उत्पादन (ॅरऊढ) ची वृद्धी दर सर्वाधिक आहे?
    - छत्तीसगड
जी-२० राष्ट्रांचे वित्तमंत्री यांचे दोन दिवसांचे संमेलन ऑक्टोबर २०१० मध्ये कोठे पार पडले?
    - दक्षिण कोरिया
चालू वर्षी २०१० मध्ये भारताचा आर्थिक वृद्धी दर हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार किती प्रतिशत असेल?
    - ९.७ टक्के
भारतामध्ये कोणत्या ठिकाणी आशियातील पहिली डीएनए बँक स्थापन केली जाणार आहे?
    - लखनौ
सहारा इंडियातर्फे देण्यात येणारा सहारा इंडिया सर्वश्रेष्ठ पुरुष खिलाडी म्हणून कोणाची घोषणा करण्यात आली आहे?
    - सुशीलकुमार (कुस्ती)
भारतातील कोणकोणत्या राज्यात उर्दूला द्वितीय भाषा म्हणून दर्जा देण्यात आला आहे?
    - बिहार व उत्तर प्रदेश
सन २०१२ मध्ये लंडन येथे होणाऱ्या ऑलिम्पक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला पहिला भारतीय केळाडू कोणता?

    - गगन नारंग
अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षण मातृभाषेत उपलब्ध करून देणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
    - तामिळनाडू
विल्यम हन्ना व जोसेफ बार्बरा यांची निर्मिती असलेल्या टॉम अ‍ॅण्ड जेरी या जगप्रसिद्ध कार्टूनला सन २०१० मध्ये किती वर्षे पूर्ण झाली?
    - ७० वर्षे.
जागतिक प्रभावशाली महिलांच्या यादीत इंदिरा गांधी यांना कितवे स्थान प्राप्त झाले आहे?
    - ९ वे स्थान
भारताच्या कोणत्या राज्यात लोक सेवा गॅरंटी अधिनियम २०१० लागू करण्यात आला?
    - मध्य प्रदेश
१९ व्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताने तिन्ही पदके (सुवर्ण, रौप्य, कांस्य) कोणत्या खेळामध्ये जिंकली आहेत?
    - थाळीफेक
सन २०१० चा अनंत भालेराव पुरस्कार हा कोणाला जाहीर करण्यात आला आहे?
    - ना. धों. महानोर
भारत सरकारने अपंगांसाठी विमा योजना चालू केली आहे, या योजनेचे नाव काय?
    - निर्भय
डीआरडीओने ३०० कोटी रुपयांची क्षेपणास्त्रे व अग्निबाण यांना लागणाऱ्या इंधनाचे उत्पादन करणारी सुविधा कोणत्या शहरात स्थापन केली?
    - नाशिक
एक्सपरिमेंटल सॅटेलाईट कम्युनिकेशन अर्थस्टोन हे अवकाश संशोधन केंद्र कोणत्या राज्यात आहे?
    - महाराष्ट्र
जानेवारी २०११ मध्ये होणाऱ्या जागतिक मराठी संमेलन ‘शोध मराठी मनाचा’ या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून यांची निवड करण्यात आली आहे?
    - डॉ. विजय भटकर
परदेशात गांधीवादी तत्त्वे व मूल्ये यांच्या प्रसारासाठी देण्यात येणारा सन २०१० चा जमनालाल बजाज पुरस्कार कोणाला जाहीर झाला?
    - लिया डिस्किन (ब्राझील)
फॅशन जगतमध्ये अभूतपूर्व योगदानाबद्दल फ्रान्सचा प्रतिष्ठित नागरी सन्मान पुरस्कार कोणाला देण्यात आला?
    - रितू बेरी (भारत)
जागतिक पहिला विश्व सांख्यिकी दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात आला?
    - २० ऑक्टोबर.
जर्मनी-भारत यांच्या मैत्रीचे प्रतीक म्हणून सन २०१२-१३ हे जर्मनीमध्ये काय म्हणून साजरे होणार आहे?
    - भारतवर्ष
विकसनशील देशाची अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस फॉर द डेव्हलपिंग वर्ल्डची विज्ञान परिषद कोठे पार पडली?
    - हैदराबाद.
चीन येथे नोव्हेंबर २०१० मध्ये पार पडलेल्या १६ व्या एशियाई स्पर्धेचे शुभंकर काय ठरवण्यात आले आहे?
    - बकरींचा समूह
कोणत्या सामाजिक कार्यकर्त्यांस सन २०१० चा लाल बहादूर शास्त्री पुरस्कार २०१० चा कोणाला प्रदान करण्यात आला?
    - अरुणा रॉय
संयुक्त राष्ट्राच्या कोणत्या परिषदेवर भारताची २ वषार्ंकरिता अस्थायी स्वरूपात निवड करण्यात आली?
    - सुरक्षा परिषद
संपूर्ण स्वदेशी बनावटीची भारतातील ७०० मेगाव्ॉट क्षमतेच्या अणुभट्टीची उभारणी सर्वप्रथम कोठे करण्यात येत आहे?
    - गुजरात
भारतात नोव्हेंबरअखेर स्वाइन फ्लूचे सर्वाधिक बळी कोणत्या राज्यात झाले?
    - महाराष्ट्र (९३५)
नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या पंधराव्या आदित्य बिर्ला पुरस्कारामध्ये कलाशिखर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?
    - पद्मश्री राज बसेरा.
केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रिमंडळाने आशियातील सर्वात मोठा सौर वीज प्रकल्प कोठे उभारण्याची घोषणा केली आहे?
    - नागपूर
देशात प्रथमच पुणे विद्यापीठातर्फे संगणक युगात अपंग मागे राहू नये म्हणून विकसित करीत असलेली वेबसाईट कोणती?
    - ब्लाइंड फ्रेंडली
सन २०१० चा एच. के. फिरोदिया प्रतिष्ठानचा पहिला प्राईड ऑफ इंडियाचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला?
    - डॉ. वेंकटरमन रामकृष्णन
५७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात कोणता चित्रपट सवरेत्कृष्ट ठरला?
    - कलुट्टी श्रांक (बंगाली)
देशात युनिसेफतर्फे सुरू करण्यात आलेले देशातील पहिले पोषण पुनर्वसन केंद्र कोठे चालू आहे?
    - लातूर.
भारत-ब्रिटन यांचा संयुक्त वायुसैनिक अभ्यास प. बंगाल येथे पार पडला, या अभ्यास मोहिमेचे नाव?
    - इंद्रधनुष्य.