जनरल नॉलेज Print

लखन रामकुँवर अग्रवाल , बुधवार, ५ जानेवारी २०११
युरोपिय संघासोबत कोणत्या देशाची पहिली शिखर परिषद संपन्न झाली.
-पाकिस्तान
२१ देशांची एशिया पॅसिफिक इकोनॉमिक को-ऑपरेशन (एपीइसी)ची २१ वी शिखर परिषद कोठे संपन्न झाली.
- सिंगापूर

सन २०१२ चे एपीइसीची शिखर परिषद कोठे भरणार आहे?
-रुस (ग्लारिवोस्तोक)
राष्ट्रमंडल शिखर संमेलनामध्ये कोणत्या देशाचा समावेश हा राष्ट्रमंडल सदस्य म्हणून करण्यात आला?
-रवांडा
२४-२५ सप्टेंबर २००९ मध्ये जी-२० चे शिखर संमेलन कोणत्या ठिकाणी भरविण्यात आले होते?
- अमेरिका (पिटर्सबर्ग)
१५ एप्रिल २०१० रोजी इब्साचे शिखर संघटनेचे चौथे शिखर संमेलन कोठे भरले होते?
-ब्राझिलिया (ब्राझील)
सूर्यावर संशोधन करण्यासाठी ११ फेब्रुवारी २०१० रोजी नासाने कोणते यान पाठविले?
-एॅटलस फाईव्ह
आरोग्य सेवा मिळविणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे, असे विधेयक मांडणारे राज्य कोणता?
-आसाम
देशातील सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संपत्ती जाहीर करण्याची मान्यता कधी दिली?
-२६ ऑगस्ट २००९
चिनी नागरिकांच्या मते सर्वात प्रभावशाली परदेशी नेत्यांमध्ये समाविष्ट असलेले दोन भारतीय नेते कोण?
-रवींद्रनाथ टागोर, पं.जवाहरलाल नेहरू
कोअर संस्थेतर्फे डॉरी स्ट्रोम्र्स पुरस्कार कोणाला जाहीर झाला?
-डॉ. राणी बंग व अभय बंग
युरो या चलनाचा वापर करणाऱ्या देशांची संख्या किती?
-१५
भारतातील पहिली इस्लामिक बँक कोठे स्थापन होणार आहे?
-केरळ
भारतातील पहिली थ्री जी सेवा ग्राहकांना पुरवणारी कंपनी कोणती?
-एमटीएनएल
यशवंतराव प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार २००९ कोणाला देण्यात आला?
-किशोरी अमोणकर
एक दिवस जीवनातला हे पुस्तक कोणी लिहिले?
-नीला सत्यनारायण
भारतीय स्टेट बँकेत सन २००९ मध्ये कोणत्या बँकेचे विलिनीकरण करण्यात आले?
-स्टेट बँक ऑफ इंदोर
आंतरराष्ट्रीय नाणे निधीमध्ये सर्वाधिक एसडीआर असणारा देश कोणता?
-अमेरिका
न्यू जर्सी येथील पहिले विश्व मराठी नाटय़ संमेलन २०१० चे अध्यक्ष कोण?
-रामदास कामत
ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जनमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो?
-तिसरा
साहित्य क्षेत्रातील अतिशय मानाचा समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार सन २०१० (मराठी साहित्य) कोणाला जाहीर झाला?
-डॉ. अशोक केळकर
भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकर याने कोणत्या संघाविरुद्ध कसोटीतील ५० वे शतक बनविण्याचा विक्रम केला?
-दक्षिण आफ्रिका
या तीन राष्ट्रांच्या समूहांनी भूक व गरिबी मिटविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी संयुक्त राष्ट्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
-इब्सा समूह
या भारतीय पत्रकारास विज्ञान पत्रकारितेसाठी अमेरिकेतील जियोफिजिकल युनियन (एजीयू) चा डेव्हिड पर्लमॅन एॅवॉर्ड देण्यात आला.
-पल्लव बागला
भारताला प्रथमच इंटरपोलच्या या कार्य समूहामध्ये सचिव पदावर निवडण्यात आले.
-वन्यजीव अपराध कार्य समूह
संयुक्त राष्ट्र बालनिधी (युनिसेफ) ने भारतीय अशिक्षित बालकांसाठी ऑनलाईन शिक्षणसेवा सुरू केली आहे. या अभियानाला देण्यात आलेले नाव.
-आवाज दो
या बँकेने आपल्या ग्राहकांसाठी कोणत्याही शाखेवरून क्रेडिट कार्डने रोख पसे काढण्याची सोय केली आहे.
- भारतीय स्टेट बँक
चीन येथे पार पडलेल्या १६ व्या आशियाई स्पध्रेत भारताला कितव्या स्थानावर समाधान मानावे लागले?
-सहाव्या
१६ व्या आशियाई स्पध्रेत भारताने किती सुवर्णपदकांची कमाई केली?
-४
नोव्हेंबर २०१० मध्ये १६ व्या आशियाई स्पध्रेत चीनने एकूण किती पदके जिंकून प्रथम स्थान मिळविले?
-१९९
जास्त वजनाचे उपग्रह सोडण्यासाठी इस्त्रो २०१० पर्यंत कोणते शक्तीशाली अग्निबाण सोडणार आहे?
-जीएसएलव्ही मार्क -३
सन २०१० चा एच.के. फिरोदिया प्रतिष्ठानचा पहिला प्राईड ऑफ इंडिया पुरस्कार कोणाला देण्यात आला?
-डॉ. व्यंकटरामन राधाकृष्णन
राज्यातील वृद्ध, अपंग, निराधार यांना राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान घरपोच देण्याच्या योजनेची सुरुवात या जिल्हयापासून होणार आहे.
-कोल्हापूर
मध्य प्रदेश सरकारतर्फे देण्यात येणारा लता मंगेशकर पुरस्काराने २००९-१० कोणाला सन्मानित करण्यात आले?
-अनुराधा पौडवाल
 मिस अर्थ स्पर्धा २०१०-११ कोठे पार पडली?
-व्हिएतनाम
२०१०-११ चा मिस अर्थ किताब पटकावणारी सुंदरी?
-निकोल फारिया (भारत)
अमेरिकेने सुरू केलेले ऑपरेशन इराकी फ्रिडमचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी केलेले नामकरण
-ऑपरेशन न्यू डॉन
 शहरातील कोणत्याही ठिकाणचे वायू प्रदूषण, वायू गुणवत्ता यांचे पूर्वानुमान लावण्यासाठी सुरू करण्यात आलेली नवीन प्रणाली
-सफर
आंध्र प्रदेशमधील तसेच देशातील तिसरा सर्वात मोठा बायोस्फियर रिझव्‍‌र्ह या ठिकाणी उभारण्यात येणार आहे
-शेषाचलम पर्वत
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या ५४ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०१० मधील महाराष्ट्र केसरीचा मानकरी
-समाधान घोडके
आशियाई क्रीडा स्पध्रेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सॅमसंगच्यावतीने दिल्या जाणार्या पुरस्कार २०१० चा मानकरी
-विजेंदर सिंग
फ्रेंच सरकारने १९८४ मध्ये कला साहित्य क्षेत्रातील अक्षरांचा शिलेदार ही पदवी बहाल केलेले प्रसिद्ध कला समीक्षक.
-ज्ञानेश्वर नाडकर्णी
बालगंधर्व अ‍ॅण्ड हिज मराठी थिएटर या पुस्तकाचे लेखक
-ज्ञानेश्वर नाडकर्णी
सत्यकथांमधून ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी या नावाने लेखन केले.
-तुकाराम शेंगदाणे
साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या साहित्यिकास दिला जाणारा िवदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचा पहिला मानकरी
-विजया राजाध्यक्ष
पब्लिक कॉज रिसर्च फाऊंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय माहिती अधिकार पुरस्कार मानकऱ्यांमध्ये यांचा समावेश आहे.
-विनिता कामटे
भारताचे सहावे पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचा जन्मदिवस.. दिन म्हणून साजरा केला जातो?
-किसान दिन
हा दिवस पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ किसान दिन म्हणून साजरा केला जातो.
-२३ डिसेंबर
८४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात (ठाणे) यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले?
-डॉ. द.भि. कुलकर्णी.