जनरल नॉलेज - देशी व विदेशी Print
लखन रामकुवर अग्रवाल ,बुधवार, २ फेब्रुवारी २०११
संपर्क- ९८२२७१२१०१
तिबेरा पीपल्स चॉइसचा आशियाई पुरस्कार हा २०१० चा कोणाला देण्यात आला?   
- सचिन तेंडुलकर
फळबाग योजना राबवणारे देशातील पहिले राज्य कोणते?
- महाराष्ट्र
तीन लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ग्रामविकास भवनाची उभारणी कोठे करण्यात येत आहे?   
- खारघर
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्राथमिक शाळेत घेण्यात येणाऱ्या आठ चाचण्यांना राज्य शासनाने कोणते नाव दिले आहे?   
- राजीव गांधी अभियान
फ्रान्स या देशाच्या राष्ट्रीय दिन या दिवशी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा मान कोणाला मिळाला?   
- पंतप्रधान मनमोहन सिंग
बीएएसआयसी या देश समुहामध्ये कोणकोणते देशांचा समावेश होतो?
 - ब्राझील, साऊथ आफ्रिका, भारत, चीन
ग्रामीण भागातील विद्युतीकरणात तेजी आणण्यासाठी भारत सरकारने कोणती योजना सुरू केली आहे.    
- राजीव गांधी विद्युतीकरण योजना
योजना आयोगाच्या ‘भारत दृष्टी-२०२० चा मुख्य उद्देश काय आहे?
- जगात अत्याधिक महत्त्वाची आíथक ताकद बनवणे
आयसीसीने वर्ल्ड कप २०११ चा आयोजनात कोणत्या देशाचा सहमेजवान दर्जा समाप्त करण्यात आला आहे?   
- पाकिस्तान
पवन ऊर्जा क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरीबद्दल कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो?      -कर्नाटक
खालील पकी कोणत्या दोन शहरांच्यामध्ये देशातील पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे?    
- मुंबई-अहमदाबाद
महिला आरक्षण विधेयक २००८ ला राज्यसभेत किती पक्षांनी विरोध केला होता?
- चार
जगात सर्वाधिक पावसासाठी प्रसिद्ध असलेले चेरापुंचीचे नाव काय आहे?
- सोहरा
२०१२ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक खेळातून कोणत्या दोन खेळांना वगळण्यात आले आहे?   
- बेसबॉल व सॉफ्टबॉल
सार्क लिगल फोरमचे अध्यक्षपद कोणत्या भारतीयाला देण्यात आले आहे?
- अभिषेक सिंघवी
मंगळ ग्रहावर पाणी व इतर मुलद्रव्यांच्या शोधासाठी नासाने मंगळावर पाठवलले मानवविरहीत यान कोणते?   
- फिनिक्स
केंद्र सरकारच्या ग्रामीण सडक योजना दृष्टीपत्र अनुसार २०२५ पर्यंत किती लोकसंख्येच्या गावांना सडकांनी जोडण्यात येईल.   
- २५०
राजस्थानचा गौरव म्हणून चित्तोगड म्हणून ओळखतात तर राजस्थानचे हृदय म्हणन कोणत्या शहराला ओळखतात.   
- अजमेर शहर
डीआरडीओने ३०० कोटी रुपयांची क्षेपणास्त्र व अठिबाण यांना लागणाऱ्या इंधनाचे उत्पादन करणारी सुविधा कोणत्या शहरात स्थापन केली?
- नाशिक
२००९ मध्ये पार पडलेली पंधरावी लोकसभा निवडणूक किती टप्प्यात घेण्यात आली?   
- पाच टप्प्यात
आशियाना शिखर परिषद ऑक्टोबर २०१० मध्ये कोठे पार पडली.
- हनोई (व्हीएतनाम)
लवन इन रिलेशनशिप अंतर्गत बरोबर राहणाऱ्या दांपत्यातील जोडीदारांनी किती निकष पूर्ण केले असतील तर महिलेश पोटगी मिळेल?     
- ४ निकष
१० वे राष्ट्रकुल स्पध्रेत भारताने किती सुवर्णपदक पटकवून दुसरे स्थान मिळवले?
- ३८ सुवर्ण
साहित्य क्षेत्रातील पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार २००८ चे मानकरी कोण आहेत?
- अख्तर खान शहरयार
पंचायत राज यशस्वीता पुरस्कारांमध्ये प्रथम क्रमांक कोणत्या दोन राज्यांनी पटकावले?    
- केरळ व कर्नाटक
बुकर पुरस्कार २०१० चा कोणत्या लेखकाला जाहीर झाला आहे?
- हॉवर्ड जेकबसन
सन २०१० मध्ये साऊथ एशियन हवामान परिषद कोठे संपन्न झाली?    
- पुणे
सन २०१० चा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला?
- जगन्नाथ महाराज पवार
भारतातील कोणत्या राज्याने मतदान करणे हे अनिवार्य आहे, असे घोषित केले आहे?    
- गुजरात
केंद्र सरकारने २२ जून २००९ मध्ये कोणत्या पार्टीला उग्रवादी संघटना म्हणून घोषित केला आहे.    
-भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्‍सवादी)
तेलंगना राज्याच्या पुननिर्मितीसाठी कोणती समिती नेमण्यात आलेली आहे?
- न्या.बी.एन. श्रीकृष्ण.
मालदिवचे राष्ट्रपती कोण आहेत?   
- मोहम्मद नशिद
नेपाळ शासनाने अलिकडेच जारी केलेल्या नाण्यांवर व नोटांवर शाही मुद्रा हटवून कोणते प्रतिक छापले आहे?   
- माऊंट एवरेस्ट व शेती करणारा शेतकरी
१६ वर्षांखालील मुलांना मोबाईल फोन विकणे तसेच शाळा व कॉलेजमध्ये मोबाईल वापरावर बंदी घातली आहे?   
- कर्नाटक
वर्ष २०१० हे निवडणूक आयोग आपल्या स्थापनेचे कितवे वर्ष साजरे करत आहेत?   
- ६० वर्षे
भारत व युरोपीयन संघ यामध्ये १० शिखर वार्ता कोठे पार पडली.
- नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) मान्यता दिल्याने क्रिकेट या खेळाचो ऑलिम्पिकमध्ये किती साली समावेश
होणार आहे?    
- २०२०
यशवंत पुरस्कार मध्ये प्रथम क्रमांकानी विजेती जिल्हा परिषद कोणती?
- रायगड जिल्हा परिषद
महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन हजारांचा टप्पा ओलंडणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण?   
- मिताली राज
म.गांधी तंटामुक्त गाव अभियान योजनेचे घोषवाक्य काय आहे?
- शांततेकडन समृद्धीकडे
भारत सरकारची बंदी असलेले बी.टी. वांगे याचे या दोन देशाच्या कंपनीने संयुक्तपणे विकसित केले आहे?   
- अमेरिका व भारत
१० एप्रिल २०१० रोजी भारतातील शिक्षण अधिकाराचा कायदा राष्ट्रास समíप्रत करण्यात आला. या अधिकाराशी संबंधीत घटना दुरूस्ती कोणती?
- ८६ वी घटना दुरूस्ती
पृथ्वी या क्षेपणास्त्राची भारतीय नौदलासाठी विकसित केलेली आवृत्ती कोणती आहे?    
- धनुष्य
आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धा २०१० भारताने या संघास पराभूत करून जिंकली.
- पाकिस्तान
संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयात झालेल्या बठकीमध्ये युरोपीयन देशांनी या वर्षांपर्यंत ग्रीनहाऊस गॅसचे उत्सर्जन निम्मे करण्याचे आवाहन केले आहे.
- २०५०
देशात सुरू करण्यात आलेल्या सर्वशिक्षा अभियान या योजनेचा नवीन नाव काय आहे?   
- राष्ट्रीय शिक्षा अभियान
मुस्लीम समाजाचा १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा कोणत्या सरकारने केली आहे.     
- केरळ
इंडियन इकोनॉमिक असोसिएशनच्या (आयईए) अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?    
- सुकदेव थोरात
राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेसाठी राज्यातील सर्व बीपीएलधारकांना किंवा कुटुंबांना लाभ देणारे पहिले राज्य कोणते?   
- हरियाणा
१० वे प्रवासी भारतीय संमेलन २०१२ चे कोठे आयोजित केले जाणार आहे?
- जयपूर
पाचवा टेन्टी-२० क्रिकेट विश्वकप २०१४ मध्ये कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे?   - बांगलादेश
महिला विश्वकरंडक हॉकी स्पध्रेचे (२०१०) चे विजेता संघ कोणता    
-अर्जेटिना
असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीची स्वावलंबन योजना सर्वप्रथम कोणत्या राज्यात राबविणार आहे?    
- पश्चिम बंगाल.
अ. भा. मराठी नाटय़ संमेलनातर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला?    
- आशा भोसले
शिक्षणाच्या हक्कांसबंधी संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रतिनिधी म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?    
- किशोर सिंग
इंटरनेटवरील अश्शील साईटसला बंदी घालणारी चीनमधील योजना कोणती आहे?    
- ग्रीन डॅम
राष्ट्रमंडल राष्ट्राध्यक्ष शिखर संमेलन २०११ कोठे  संपन्न होणार आहे?
- ऑस्ट्रेलिया
२ सप्टेंबर २००९ ला इंटरनेट सुविधेला किती वष्रे पूर्ण झाली     
- ४० वर्षे
राज्यातील ५ वर्ग महानगरपालिकांमध्ये १ एप्रिल २०१० पासून जकाती ऐवजी कोणता कर लागू करण्यात आला.   
- स्थानिक संस्था कर
लोकांच्या दारी न्याय नेण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ग्राम न्यायालय ही अभिनव न्याययंत्रणा केव्हा सुरू करण्यात आली.    
- २ ऑक्टोबर २००९
डॉग फेंग- २ सी हे जहाजविरोधी क्षेपणास्त्र कोणत्या देशाचे आहे.   
- चीन
२०१२ या ३० व्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे.   
- लंडन
ग्रामीण विकास मंत्रालयाने सुवर्ण जयंती ग्रामविकास  योजनेस दिलेले नवीन नाव कोणते?     - राष्ट्रीय आजिविका मिशन
मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यावरील सूत्रधार ‘झाकीर उर रहेमान लाखवी कोणत्या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे.    
- लष्कर-ए-तोयबा
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या वतीने ‘हॉल ऑफ फेम’ मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूची निवड करण्यात आली.    
- कपिल देव
२० जानेवारी २०१० मध्ये राष्ट्रपतीपदासाठी श्रीलंकेत झालेल्या निवडणुकीस कोणाची राष्ट्रपतीपदासाठी निवड झाली.   
- मिहद्रा राजपक्षे
२ नोव्हेंबर २००३ मध्ये अफगाणिस्तानमध्ये झालेल्या निवडणुकीत कोणाची राष्ट्रपतीपदासाठी निवड झाली.    
- हामीद करजई
संयुक्त राष्ट्र संघटनेची १५ परिषद कोठे झाली?    
- डेन्मार्क
भारतातील पहिले हरीत शहर म्हणून कोणत्या शहराची घोषणा करण्यात आली.
- आगरताळा
सुमीत २००९ चे शिखर संमेलन कोठे पार पडले    
- लंडन
केंद्र सरकारने महाराष्ट्रातील ३८ लाख शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजनेंतर्गत किती रक्कम दिली आहे.   
- ७८०० कोटी रुपये
पुणे विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला.
- नारायण सुर्वे
हिवाळी ऑलिम्पिक २०१४ मध्ये कोठे भणार आहे.    
- सोची (रशिया)
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे नवीन पाच अस्थायी सदस्य कोणते
- नायजेरिया, ब्राझील, लेबनान, बोस्निया, गॅबोन
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य ५ देश कोणते?
- अमेरिका, रूस, फ्रान्स, ब्रिटेन व चीन