महत्वाच्या घटना Print
संकलन-प्रशांत देशमुख , बुधवार, ३ फेब्रुवारी २०१०
संचालक-संत गाडगेबाबा प्रबोधिनी, मुंबई
९९६९५३९०५१/९३७१९१९००६

* १९५०, २६ जानेवारी - पहिला भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा.
* १९५०, २३ मार्च - भारतात नियोजन आयोगाची स्थापना.
* १९५१, १ एप्रिल - पहिली पंचवार्षिक योजना सुरू.
* १९५२ - भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक पार.
- आंध्र प्रदेश स्थापनेचा निर्णय, राज्य निर्मितीसाठी पोडू श्रीरामुलू यांचे उपोषण व मृत्यू.
- डॉ. राजेंद्रप्रसाद पहिले राष्ट्रपती व पंडित नेहरू पहिले पंतप्रधान झाले.
* १९५३ - यूजीसीची स्थापना (सध्या अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात)
* १९५४ - पंचशील करार पंडित नेहरू व चौ. एन. लाय चीनचे पंतप्रधान यांच्यामध्ये.
* १९५५ - हिंदू कोड बिलाला मान्यता.
* १९५६ - भाषावार राज्य पुनर्रचना, भाषाकार भाषिक तत्त्वांवर स्थापन झालेले पहिले राज्य आंध्र प्रदेश.
* १९५६ - भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा तुर्भे येथील बीएआरसी केंद्रात कार्यान्वित.
* १९५६, ६ डिसेंबर - भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय घटनेचे शिल्पकार व दलितांचे नेते भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन.
* १९५६, २० डिसेंबर -  निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचे अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे पेढी नदीच्या तीरावर निधन.
* १९५७ - भारतात दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुका.
* १९५७ - रशियाचा पहिला उपग्रह ‘स्पुटनिक’ अवकाशात झेपावला.
* १९५९ - भारतात राजस्थानमध्ये पंचायत राजची सुरुवात, दिल्ली येथे दूरदर्शन केंद्र सुरू.
* १९६०, १ मे - महाराष्ट्र राज्याची निर्मिती.
* १९६१, १९ डिसेंबर - पोर्तुगीजांकडून गोवा मुक्त.
* १९६२ - भारत-चीन युद्ध, भारतात पहिल्यांदा राष्ट्रीय आणीबाणी.
* १९६४ - भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचे निधन.
* १९६५ - भारत-पाकिस्तान युद्ध.
* १९६६ - भारत-पाक युद्ध संपुष्टात आणणारा ताश्कंद
करार. अयुबखान व लाबहाद्दुर शास्त्री यांच्यामध्ये (रशियाच्या साहाय्याने).
* १९६६ - शिवसेना पक्षाची स्थापना, संस्थापक- श्री. बाळासाहेब ठाकरे.
* १९६६, २४ जानेवारी- इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान.
* १९६७ - महाराष्ट्रात कोयना येथे भूकंप.
* १९६७ - भारतात चौथ्या सार्वत्रिक निवडणुका.
* १९६९ - भारतात अवकाश संशोधन केंद्राची स्थापना.
* १९६९, १९ जुलै - इंदिरा गांधीच्या कारकीर्दीत १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण.
* १९७० - आसाम राज्याचे विभाजन करून मेघालय राज्याची स्थापना.
* १९७१ - भारत-पाक युद्धात भारताचा विजय व बांगलादेशाची निर्मिती.
* १९७२ - ‘सिमला करार’ इंदिरा गांधी व भुट्टो यांच्यामध्ये.
* १९७२ - पोस्टात पीन कोड नंबरची सुरुवात.
* १९७४ - राजस्थानातील पोखरण येथे भारताचा पहिला अणुस्फोट (१८ मे).
* १९७५, १९ एप्रिल - आर्यभट्ट पहिला उपग्रह अवकाशात सोडला.
* १९७५, २६ जून - इंदिरा गांधींनी पहिली अंतर्गत आणीबाणी लागू केली.
* १९७७ - इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली व पंतप्रधान पक्षाचा राजीनामा. लोकसभेच्या नव्याने निवडणुका, जनता पक्षाची स्थापना व मोरारजी देसाई यांची चौथे पंतप्रधान म्हणून निवड.
* १९७८ - भारत सरकारने १०,०००, ५,००० व १,००० रुपयांच्या नोटा बंद केल्या.
* १९८० - जनता पक्षात पुन्हा फूट. भारतीय जनता पार्टी या स्वतंत्र पक्षाची स्थापना.
* १९८३ - केंद्र राज्य संबंधांसंदर्भात ‘सरकारीया’ आयोगाची स्थापना.
* १९८४ - पहिला अंतराळवीर राकेश शर्मा अंतराळात,
जून- ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’,
३१ ऑक्टो. इंदिरा गांधीची निघृण हत्या.
* १९८५ - पंजाबच्या समस्येवर राजीव गांधी-लोंगोवाल यांच्यामध्ये पंजाब करार.
* १९८६ - जनरल अरुणकुमार वैद्य यांची पुण्यामध्ये हत्या.
* १९८७ - आर. व्यंकटरामण भारताचे नवीन राष्ट्रपती म्हणून पदग्रहण.
* १९९० - मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय.
* १९९१, २१ मे - राजीव गांधीची पेरांबुदूर येथे निघृण हत्या.
* १९९२ - बाबरी मशीद घटना (६ डिसेंबर).
* १९९३, १२ मार्च - मुंबईत एकाच वेळी १० ठिकाणी बॉम्बस्फोट, २५० हून अधिक बळी.
* १९९३, ३० सप्टेंबर - महाराष्ट्रातील लातूर येथे भूकंप.
* १९९५ - भारत जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य.
* १९९६ - केंद्रात एनडीए सरकारची स्थापना, अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान.
* १९९७ - भारताच्या स्वातंत्र्याची ५० वर्षे पूर्ण.
* १९९८ - डॉ. अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक. ११ व १३ मे रोजी राजस्थानातील          पोखरण येथे अणुबॉम्ब व हायड्रोजन बॉम्बची चाचणी.
* १९९९ - फेब्रुवारी - पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची वाघा सरहद्दीपासून लाहोपर्यंत बस यात्रा.
- कारगिल युद्ध.
* १९९९ - महाराष्ट्रात विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन.
* १९९९ - राष्ट्रीय सुरक्षा समितीची स्थापना (अध्यक्ष पंतप्रधान).
* २००० - छत्तीसगढ, उत्तरांचल व झारखंड या नवीन राज्यांची निर्मिती.
* २०००, ११ सप्टेंबर - वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला.
- १३ डिसेंबर भारतीय संसदेवर आतंकवाद्यांचा हल्ला.
* २००२ - गोध्रा हत्याकांड (गुजरात).
* २००५ - श्रीनगर, मुझफ्फराबाद बससेवेला प्रारंभ.
- माहिती अधिकाराचा कायदा (१२ ऑक्टोबर)
- सेवाकराची अंमलबजावणी (१ एप्रिल)
* २००६ - मुंबईत लोकलमध्ये बॉम्बस्फोट.
* २००७ - २५ जुलै भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची नियुक्ती.
* २००८ - २६ नोव्हेंबर - रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला.