जनरल नॉलेज : स्पर्धा परीक्षा - महाराष्ट्र माझा Print
संकलन- प्रशांत देशमुख  - गुरूवार, १ एप्रिल २०१०
संचालक- संत गाडगेबाबा स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी, मुंबई
संपर्क-
९९६९५३९०५१/ ९३७१९१९००६
‘बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा..’ या शब्दात कोल्हटकरांनी आपल्या महाराष्ट्राची थोरवी गायिली आहे. अजिंठा, वेरुळ, कार्लेभाजे, कान्हेरी, एलिफंटा, पांडव लेण्यांनी नटलेला संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत गोरोबा, संत जनाबाई, संत गाडगेबाबा, कान्होपात्रांनी मंतरलेला; छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीने तेजाळलेला, संभाजीच्या हौतात्म्याने अजरामर झालेला, माँ जिजाऊच्या आशीर्वादाने बहरलेला; फुले, आंबेडकर, शाहू, आगरकर, सावरकर, टिळक, फडके यांच्या त्याग आणि क्रांतीकार्याने पुनीत झालेला हा महाराष्ट्र कसा असावा? हे महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षार्थीला माहिती असणे आवश्यक आहे.
भारतात महाराष्ट्राचा क्षेत्रफळात तिसरा क्रमांक (९.३६ टक्के), तर लोकसंख्येत (९.४२ टक्के) दुसरा क्रमांक लागतो.
महाराष्ट्र राज्याच्या अगोदर द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना- १ नोव्हेंबर १९५६.
महाराष्ट्र राज्याची स्थापना - १ मे १९६०.
महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात- १ मे १९६२.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री- यशवंतराव चव्हाण, राज्यपाल- श्री प्रकाश
महाराष्ट्राचे क्षेत्रफळ- ३,०७,७१३ चौ.कि.मी.
महाराष्ट्राचा विस्तार- अक्षांश १५ अंश ८’ उत्तर ते २२ अंश १’ उत्तर. रेखांश ७२ अंश ६’ पूर्व ते ८० अंश ९’ पूर्व.
महाराष्ट्राचा पूर्व-पश्चिम विस्तार- ८०० कि.मी., उत्तर-दक्षिण विस्तार- ७०० कि.मी.
महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी- ७२० कि.मी. (सर्वात जास्त- रत्नागिरी)
महाराष्ट्राची राजधानी- मुंबई, उपराजधानी- नागपूर
प्रशासकीय विभाग- सात (कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर).
महाराष्ट्रात एकूण जिल्हे- ३५, जिल्हा परिषदा- ३३, पंचायत समिती- ३५३, ग्रामपंचायत- २८,०२९, महानगरपालिका- २३, नगरपालिका- २२४. नगरपंचायती- दापोली, शिर्डी, कणकवली (३), कटकमंडळे- ७
महाराष्ट्रात एकूण महसूली खेडी- ४३,७२५.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने वसई-विरार उपविभागासाठी सर्वप्रथम १३ सप्टेंबर २००६ रोजी महानगरपालिका घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
महाराष्ट्र राज्याचा वृक्ष- आंबा, राज्य प्राणी- शेकरू, राज्य फूल- मोठा बोंडारा/ तामन, राज्य पक्षी- हरावत, राज्य भाषा- मराठी.
महाराष्ट्राच्या सरहद्दीवरील राज्य- वायव्य- गुजरात व दादरा नगर-हवेली (संघराज्य), उत्तर- मध्य प्रदेश, दक्षिण- गोवा व कर्नाटक, आग्नेय- आंध्र प्रदेश. पूर्वेस- छत्तीसगड.
महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा -
१) मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया
२) कर्नाटक - कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
३) आंध्र प्रदेश- गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड.
४) गुजरात - ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे.
५) दादरा, नगर-हवेली- ठाणे, नाशिक.
६) छत्तीसगड- गोंदिया, गडचिरोली.
७) गोवा- सिंधुदुर्ग.
२००१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या- ९ कोटी, ६८ लाख, ७९ हजार.
लोकसंख्येची घनता- ३१४ व्यक्ती दर चौ. कि.मी.
स्त्री-पुरुष प्रमाण- ९२२ (दरहजारी).
पुरुष साक्षरता- ८३.३ टक्के, स्त्री साक्षरता- ६७.५ टक्के (२००५- ७१.६० टक्के).
महाराष्ट्रातील : १) क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा- अहमदनगर, लहान जिल्हा- मुंबई शहर
२) सर्वात जास्त पावसाचे ठिकाण - अंबोली (सिंधुदुर्ग), सर्वात कमी- सोलापूर
३) सर्वात जास्त साक्षर जिल्हा- मुंबई उपनगर सर्वात कमी- नंदूरबार.
४) सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा- मुंबई उपनगर, सर्वात कमी- गडचिरोली.
५) सर्वात जास्ते स्त्रिया असणारा जिल्हा- रत्नागिरी, सर्वात कमी- मुंबई शहर.
६) सर्वाधिक लोकसंख्या वाढीचे प्रमाण- ठाणे, सर्वात कमी- सिंधुदुर्ग.
७) सर्वाधिक लोकसंख्येची घनता - बृहन्मुंबई, सर्वात कमी- गडचिरोली.
८) सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा- अहमदनगर.
९) सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा- अहमदनगर.
महाराष्ट्रातील सर्वात पहिले :
१) पहिले साप्ताहिक- दर्पण (१८३२) २) पहिले मासिक- दिग्दर्शन (१८४०) ३) पहिले दैनिक वर्तमानपत्र- ज्ञानप्रकाश ४) पहिली मुलींची शाळा- पुणे (१८४८) ५) पहिली सैनिकी शाळा- सातारा ६) पहिला साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग ७) पहिला संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा- वर्धा ८) पहिला पर्यटन जिल्हा- सिंधुदुर्ग ९) पहिले पाण्याचे खासगीकरण करणारे शहर- चंद्रपूर १०) पहिले ऊर्जा उद्यान- पुणे ११) उपग्रहाद्वारे शहराचे सर्वेक्षण करणारी पहिली नगरपालिका- इचलकरंजी (कोल्हापूर)
महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व हवामान :-
महाराष्ट्राचे प्राकृतिकदृष्टय़ा तीन प्रमुख विभाग- कोकण किनारपट्टी, पश्चिम घाट व महाराष्ट्र पठार इ.
सह्य़ाद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन किनारपट्टी तयार झाली.
कोकण किनारपट्टीची उत्तर-दक्षिण लांबी ७२० कि.मी. तर रुंदी ४० ते ८० कि.मी. आहे.
उत्तरेकडील दमणगंगा नदीपासून दक्षिणेकडील तेरेखोल खाडीपर्यंतचा प्रदेश कोकणपट्टीत मोडतो.
कोकणामध्ये सखल प्रदेशाची उंची पश्चिमेकडील पूर्वेकडून वाढत जाते.
महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी ४४० कि.मी. आहे.
सह्य़ाद्री पर्वतास ‘पश्चिम घाट’ असेसुद्धा म्हणतात.
उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत सह्य़ाद्री पसरलेला आहे.
सह्य़ाद्री पर्वताची सरासरी उंची १२०० ते १३०० मीटर आहे.
महाराष्ट्राचा ९० टक्के भूभाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे.
महाराष्ट्राचे हवामान उष्ण कटिबंधीय मोसमी प्रकारचे आहे.
महाराष्ट्रातील पठारी भागाचे हवामान विषम व कोरडे आहे.
कोकणपट्टीचे हवामान दमट व सम प्रकारचे आहे.
अरबी समुद्रातून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून महाराष्ट्रात पाऊस पडतो.
सह्य़ाद्री पर्वताच्या पश्चिम उतारावर प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.
सह्य़ाद्री पर्वताच्या पूर्वेकडील पठारास महाराष्ट्र
पठार किंवा दख्खन पठार असे म्हणतात.
शंभू महादेव डोंगररांगामुळे भीमा व कृष्णा नद्यांची खोरी वेगळी झाली.
हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली.
सातमाला अजिंठा डोंगररांगांमुळे गोदावरी व तापी नद्यांची खोरी वेगळी झाली.
महाराष्ट्रातील परीक्षाभिमुख इतर वैशिष्टय़े व जिल्हानिहाय टोपण नावे :-
भारताचे प्रवेशद्वार- मुंबई
भारताची आर्थिक राजधानी - मुंबई.
महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा- मुंबई शहर
महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार- रायगड
महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा- रायगड
मुंबईची परसबाग - नाशिक
महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा- रत्नागिरी
मुंबईचा गवळीवाडा- नाशिक
द्राक्षांचा जिल्हा- नाशिक
आदिवासींचा जिल्हा- नंदूरबार
महाराष्ट्रातील कापसाचे शेत- जळगाव
महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा- यवतमाळ
संत्र्याचा जिल्हा- नागपूर
महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ- अमरावती
जंगलांचा जिल्हा- गडचिरोली
महाराष्ट्रातील केळीच्या बागा- जळगाव
साखर कारखान्यांचा जिल्हा- अहमदनगर
महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार- सोलापूर
महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा- कोल्हापूर
कुस्तीगिरांचा जिल्हा- कोल्हापूर
लेण्यांचा जिल्हा- औरंगाबाद
महाराष्ट्रातील बावन्न दरवाजांचे शहर- औरंगाबाद
महाराष्ट्रातील जुन्या मराठी कवींचा जिल्हा- बीड
महाराष्ट्रातील भवानी मातेचा जिल्हा- उस्मानाबाद
महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा- नांदेड
देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा- अमरावती.
(क्रमश:)