नरेंद्र मोदींच्या परदेश दौ-याची माहिती देण्यास गुजरात सरकारची अडवणूक Print

alt

अहमदाबाद, ३ आँक्टोबर २०१२
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या परदेश दौ-यावर करण्यात आलेल्या खर्चाची माहिती उघडकीस आणण्याची मागणी करत असताना, माहिती अधिकाराअंतर्गत मागवण्यात आलेल्या मोदींच्या परदेश दौ-यावर झालेल्या खर्चाची माहिती देण्यात गुजरात सरकार असमर्थ ठरत असल्याचे समोर आले आहे.
नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाल्यापासून ते १५ आँगस्ट २०१२ पर्यंत गुजरात सरकारने मोदींच्या परदेश दौ-यावर किती खर्च केला, याबाबतची तपशीलवाराची माहिती मूळचे गुजरातमधील कच्छ येथे राहणारे आणि मुंबईत कच्छ लढायक मंच ह्या सामाजिक संस्थेचे संचालक रमेश जोशी यांनी २३ आँगस्ट २०१२ रोजी माहिती अधिकाराअंतर्गत मुख्यमंत्री कार्यालयातून मागवली होती.
तुम्ही मागवलेली माहिती विस्तृत स्वरूपाची असून ती वेगवेगळ्या सरकारी खात्यांशी निगडीत आहे, त्यामुळे ती एकत्रित करावी लागणार असल्याचे मुंख्यमंत्री कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी डी. बी. झाला यांनी सांगितले.
अशा प्रकारची माहिती जमा करून देणे ही मुंख्यमंत्री कार्यालयाची जबाबदारी नसल्याचेही झाला पुढे म्हणाले. तसेच तरीही तुम्हाला माहिती हवी असल्यास तुम्ही इतर सरकारी खात्यांकडे अर्ज करू शकता, असा सल्लाही झाला य़ांनी जोशी यांना दिला.