सर्व शाळांमध्ये सहा महिन्यांच्या आत पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहे हवीत Print

alt

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली, ३ आँक्टोबर २०१२
सहा महिन्यांच्या आत सर्व शाळांमध्ये पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात असे निर्देश आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला दिले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश के.एस.राधाकृष्णन यांच्या खंडपीठाने आज देशभरातील सर्व शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठराविक कालावधी ठरवून दिला. सर्व राज्यांतील सरकारी शाळांमध्ये विशेषत: मुलींसाठी स्वच्छतागृहे बांधून देण्याचे आदेश गतवर्षी १८ आँक्टोबर रोजी न्यायालयाने दिले होते.
सर्व शाळांमध्ये स्वच्छता गृहांची व्यवस्था असणे बंधनकारक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. तसेच ज्या शाळांमध्ये स्वच्छता गृहांची व्यवस्था नाही अशा शाळांमध्ये पालक आपल्या मुलांना (मुख्यत्वे मुलींना) शाळेत पाठवत नसल्याचे एका सर्वेक्षणात निर्दशनास आले होते.