महागडय़ा गॅस सिलिंडरला इंडक्शन कुकरचा पर्याय Print

alt

जमशेदपूर, ३ ऑक्टोबर/पीटीआय
अनुदानित गॅस सिलिंडरच्या संख्येवर सरकारने मर्यादा आणल्याने आता ब्रँडेड कंपन्यांच्या इंडक्शन कुकरला मागणी वाढली आहे. हे कुकर विजेवर चालणारे असले तरी त्यांना तुलनेने वीज कमी लागते. जिथे भारनियमनाचे प्रमाण कमी आहे अशा ठिकाणी त्यांचा वापर करता येणार आहे.
सिंगभूम चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष सुरेश सोंथालिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की ब्रँडेड कंपन्यांच्या इंडक्शन कुकरला मागणी वाढली आहे. हावेल, बजाज व प्रेस्टिज या कंपन्या त्यात आघाडीवर आहेत. जमशेदपूर येथे त्यांचा खप ३५ ते ४० टक्क्यांनी वाढला आहे. सोंथालिया यांनी सांगितले, की टाटा स्टीलच्या भागात या कुकर्सचा खप वाढला आहे याचे कारण तेथे वीजपुरवठा हा साधारणपणे अखंडित आहे, त्यामुळे महागडे गॅस सिलिंडर वापरण्यापेक्षा इंडक्शन कुकर वापरणे केव्हाही किफायतशीर ठरणार आहे. इंडक्शन कुकरची किंमत साधारण २००० वॉटच्या स्टोव्हसाठी तीन हजार रुपये आहे व ही रक्कम वर्षभराच्या वापरात वसूल होते.
इंडक्शन कुकर
बाजारपेठ- ११०० कोटी रु.
उत्पादक कंपन्या- फिलिप्स, बजाज, हावेल, प्रेस्टिज, मर्फी रिचर्ड्स, खेतान, उषा, जयपान, क्रॉम्टन ग्रीव्हज्, पिजन, सनफ्लेम, प्रिथी, ग्लेन जीएल, इनालसा, ग्रीनशेफ, केनवूड.
खपातील अपेक्षित वाढ- ५० टक्के
खर्च- वीज दर २०/३० टक्के वाढले तरी किफायतशीर असा कंपन्यांचा दावा
आरोग्याशी संबंध- उलट तेलाचा वापर ८० टक्के कमी होतो.
इतर पर्याय-मायक्रोवेव्ह ओव्हन (१५ लाख खप होऊ शकतो), राइस कुकर, एअरफ्रायर.
ऊर्जा वापर- एलपीजी गॅस वापरात ४० टक्के ऊर्जा वाया जाते. इंडक्शन कुकरमध्ये केवळ १६ टक्के ऊर्जा वाया जाते.
मर्यादा- वीजपुरवठा सुरळीत असणे गरजेचे.
कुणाला परवडतो- महिना २००००-३०००० रु. उत्पन्न गट.