गैरहजर राहिल्याबद्दल १०७ कर्मचारी निलंबित Print

श्रीनगर : सेवेत गैरहजर राहिल्याबद्दल जम्मू-काश्मीर सरकारने शोपियन जिल्ह्यातील १२ राजपत्रित अधिकाऱ्यांसह १०७ कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी पावले उचलली आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता अथवा मंजुरी न घेताच सेवेत गैरहजर राहण्याच्या वाढत्या प्रकारांना पायबंद घालण्यासाठी जिल्हा विकास आयुक्त मोहम्मद जावेद खान यांनी १०७ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे, असे अधिकृत प्रवक्त्याने सांगितले.