सहा भारतीय शांती सैनिकांवर काँगोत हल्ला Print

alt

संयुक्त राष्ट्रसंघ, १९ आँक्टोबर २०१२
काँगो येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अभियानादरम्यान झालेल्या हल्ल्यात सहा भारतीय शांतीसैनिक जखमी झाले आहेत. हा हल्ला सुनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जखमी झालेले सहा भारतीय सैनिक हे 'युनिएन आँर्गनायझेशन स्टॅबिलेशन मिशन इन डेमोक्रॅटीक रिपब्लिक आँफ काँगो' (एमओएनयूएससीओ) येथील तुकडीत कार्यरत होते. १७ आँक्टोबरला चार नागरीकांच्या प्रेतांचा तपास करुन आपल्या बरोबरचे दुभाषी आणि इतर बारा सैनिकांबरोबर किवू प्रांतातून परतत असताना हा हल्ला करण्यात आला.
हा हल्ला सुनियोजित असल्याचे या अभियानाचे प्रमुख आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या सचिवांचे प्रतिनिधी राँजर मेसे यांनी स्पष्ट केले. तसेच हल्लेखोरांचा तपास काढण्यासाठी व त्यांची ओळख पटावी यासाठी काँगोच्या अधिका-यांची मदत घेण्यात येणार असल्याचंही ते पुढे म्हणाले.
अशाचप्रकारे जुलै महिन्यात काँगो सैन्य आणि रीबेल ग्रुप मध्येझालेल्या "मार्च २३" या मिशनदरम्यान क्राँस फायरींगमुळे एका भारतीय शांतीसैनिकाचा मृत्यु झाला होता.