इराकमध्ये हिंसक हल्ल्यात १५ ठार Print

पीटीआय, बगदाद
इराकच्या मध्यवर्ती आणि उत्तरेकडील भागांत मुख्यत्वे सरकारी अधिकारी आणि सुरक्षा दलाच्या जवानांवर गुरुवारी करण्यात आलेल्या हल्ल्यात १५ जण ठार झाले. ईदच्या सणानिमित्त सुटी असतानाच करण्यात आलेला या महिन्यातील हा सर्वात भीषण हल्ला होता.
बेछूट गोळीबार आीण बॉम्बहल्ल्यात आणखी १३ जण जखमी झाले आहेत. अनेक आठवडय़ांच्या शांततेनंतर करण्यात आलेल्या हल्ल्याने हिंसाचाराचा पुन्हा उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.