ओबामांना मुस्लिमांचा पाठिंबा? Print

पीटीआय, वॉशिंग्टन
महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांना अमेरिकेतील मुस्लीम बांधवांनी मोठय़ा प्रमाणात पाठिंबा दिला असल्याचे ताज्या जनमत चाचणीत स्पष्ट झाले आहे.
ओबामा यांना ६८ टक्के मुस्लीम बांधवांनी मते देण्याची तयारी दर्शविली आहे, तर केवळ सात टक्के मुस्लीम मतदार ओबामांच्या विरुद्ध निवडणूक लढवत असलेले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार मिट रोम्नी यांच्या बाजूने कौल देऊ इच्छितात, असे अमेरिकन इस्लामिक रिलेशन्स काऊंसिलने प्रसृत केलेल्या पत्रकात म्हटले आहे.