केट मिडल्टन इंग्लंडची सौंदर्यसम्राज्ञी! Print

पीटीआय, लंडन

आपल्या नैसर्गिक सौंदर्याने साऱ्या जगाला भुरळ घालणारी, प्रिन्स विल्यम्स याची पत्नी केट मिडल्टन हिने इग्लंडमधील सर्वात अभिजात सौंदर्यवती होण्याचा बहुमान पटकावला आहे. हॉलीवूडच्या किआरा नाइटली आणि एमा व्ॉटनसन या रूपगर्वितांना मागे टाकत इंग्लंडच्या राजघराण्याची सून असलेल्या केटने हा किताब पटकावला आहे. तर टायटॅनिक चित्रपटामुळे जगभरात प्रसिद्ध झालेली केट विन्स्लेट ही या जनमत चाचणीत तब्बल ८ व्या क्रमांकावर राहिली. कोणत्याही कृत्रिम सौंदर्य साधनांचा वापर न करता केवळ नैसर्गिक सौंदर्याच्या कसोटीवर सर्वात देखण्या महिलेची निवड करण्यासाठी नुकतीच इंग्लंडमध्ये एक जनमत चाचणी घेण्यात आली. हॉलीवूडच्या किआरा नाइटली, एमा व्ॉटसन, केली ब्रूक, केट विन्स्लेट, शेरील कोल यांच्यासह केट मिडल्टन आणि तिची लहान बहीण पिप्पा या नैसर्गिक सौंदर्यवतींच्या यादीत होत्या. या जनमत चाचणीत ३० वर्षीय केटला सर्वाधिक मते मिळाली. ब्रिटिश रॉयल कुटुंबाशी निगडित असलेल्या केटच्या अभिजात सौंेदर्याची केवळ पुरुषांनाच नव्हे, तर जगभरातील हजारो महिलांनादेखील भुरळ पडली आहे. अनेक महिला तिच्यासारखे दिसण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
नुकतेच प्रिन्स विल्यमसोबत मलेशिया येथील मशिदीला भेट देताना केट हिने फिक्कट करडय़ा रंगाचा पोषाख आणि डोक्यावर स्कार्फ ओढला होता. त्या वेळी सर्वानाच अभिजात सौंदर्याची मूर्ती असणाऱ्या प्रिन्सेस डायनाची आठवण झाली होती.
इंग्लंमधील या जनमत चाचणीत केटला सर्वाधिक १६ टक्के मते मिळाली. तिच्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या ‘धिस मॉर्निग’ कार्यक्रमाची निवेदिका हॉली विलौगबी हिला १० टक्के मते मिळाली. त्यानंतर तिसऱ्या स्थानावर हॉलीवूड तारका किआरा नाइटली हिला समाधान मानावे लागले. त्यापाठोपाठ मॉडेल केली ब्रूक (८ टक्के), ऑलिंपियन जेस्सिका ईन्निस (७ टक्के) यांनी लोकांची पसंती मिळवली. केटची छोटी बहीण पिप्मा हिला १० व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.