गुजरातमध्ये पुन्हा भाजपचीच सत्ता Print

alt

नवी दिल्ली, २६ ऑक्टोबर २०१२
गुजरामध्ये डिसेंबर महिन्यात होणा-या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष सत्तेवर येणार असल्याचा निष्कर्ष ओपिनियन पोलमध्ये काढण्यात आला आहे. गेल्या दशकभरात झालेला विकास आणि दुबळा विरोधी पक्ष याचा फायदा मोदी सरकारला होणार असून, २००७च्या तुलनेत भाजप पुन्हा जास्त जागा जिंकताना दिसेल, असे एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे.
गुरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने २००७ साली ११७ जागा जिंकल्या होत्या. त्यामध्ये ११ जागांची भर पडून ही संख्या १२८ वर जाईल, असा अंदाज आज तकच्या पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसची स्थिती २००७च्या तुलनेत आणखीच बिकट होण्याची शक्यता आहे.
तर, भाजपमधून बाहेर पडलेले व गुजरात परिवर्तन पक्षाची स्थापना केलेले केशुभाई पटेल यांचे या निवडणुकीत अस्तित्त्वच जाणवणार नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, २००२च्या गुजरात दंगलीला नरेंद्र मोदीच जबाबदार असल्याचे २८ टक्के लोकांनी म्हटले आहे. तर, तब्बल ५८ टक्के लोकांनी जबाबदार नसल्याचे म्हटले आहे. तसेच गुजरात दंगलीबाबत मोदींना माफी मागितली तरी त्यांना माफ करणार नसल्याचे ६० टक्के मुस्लिमांचे म्हणणे आहे.
१८२ जागांच्या गुजरात विधानसभेमध्ये २००७च्या निवडणुकांत भाजपला ११७ जागा मिळवण्यात यश आलं होतं. तर काँग्रेसला ५९ जागा मिळाल्या होत्या. गुजरात विधआनसभा निवडणुकीसाठी १३ आणि १७ डिसेंबर रोजी मतदान होणार असून २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.