बराक ओबामांना लवकर मतदान करणा-या अध्यक्षांचा मान Print

alt

वॉशिंग्टन, २६ ऑक्टोबर २०१२
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ६ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. मात्र, निवडणुकीला १२ दिवस शिल्लक असताना विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांनी आज (शुक्रवार) शिकागो येथील मार्टिन ल्यूथर किंग कम्युनिटी सेंटर येथे जाऊन लवकर मतदान करणा-या अध्यक्षांचा मान मिळविला आहे.
व्हर्जिनियातील रिचमंड येथील प्रचार कार्यात व्यक्त असतानाही ओबामा यांनी वेळ काढून मतदानाला प्राथमिकता दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  ओबामांनी मतदान केंद्रावर असलेल्या निवडणूक कर्मचा-यांना हात उंचावून अभिवादन केले. मतदान केंद्रात गेल्यावर ओबामा यांनी तेथील नागरिकांचे अभिनंदन करून लवकर मतदान करण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले.
एखाद्या विद्यमान अध्यक्षाने लवकर मतदान करण्याची ही पहिलीच वेळ आहे असं, मतदानासाठी प्रतीक्षा करीत असताना ओबामा म्हणाले. निवडणूक कर्मचाऱ्याने ओळखपत्र मागितले असता ओबामा यांनी वाहतूक परवाना सादर केला.