अफगाणिस्तानमध्ये आत्मघातकी हल्ल्यात ३२ ठार Print

काबूल, २६ ऑक्टोबर २०१२
उत्तर अफगाणिस्तानातील मशिदीत झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात ३२ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
उत्तर अफगाणिस्तानातील फरयाब प्रांतातील मयमाना शहराच्या मशिदीत आज (शुक्रवार) सकाळी आत्मघातकी हल्ला झाला, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आत्मघातकी हल्लेखोराने त्याच्या शरीरावर लागलेल्या स्फोटकांचा स्फोट घडवून आणला. यात मशिदीतील ३२ जण ठार झाले असून २० गंभीर जखमी झाले आहेत. ईद-अल-अधानिमित्त मशिदीत विशेष नमाज आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी मोठ्या संख्येने मुस्लीम भाविक मशिदीत जमले होते.
या हल्ल्यात काही पोलिसांचाही मृत्यू झाल्याचे फरयाब प्रांताचे गव्हर्नर अहमद जावेद बैदर यांनी सांगितले आहे. हल्लेखोराने पोलिसाचा गणवेश घातला होता.