जाचाला कंटाळलेली पुण्यातील महिला तामिळनाडूत Print

पीटीआय, रामेश्वरम (तामिळनाडू)
सासरच्या  जाचाला कंटाळून पुणे येथील एका महिलेने घर सोडले आणि ती थेट रामेश्वरमला जाऊन पोहोचली. मात्र पोलिसांनी तिचे मन वळवून तिला पुन्हा पुण्याला धाडले. याबाबत पुण्यातील तिच्या कुटुंबीयांना कळविण्यात आले आहे.दोन मुलांची आई असलेली ही महिला काल रेल्वेतून रामेश्वरमला उतरली आणि स्थानकावरच भेदरलेल्या अवस्थेत फिरताना पोलिसांच्या नजरेस पडली. त्यानंतर तिने रामनाथस्वामींच्या मंदिरात पूजाही केली. सासरच्च्या जाचाला कंटाळून आपण घर सोडल्याचे तिने पोलिसांना सांगितले.