हुंडय़ाच्या गुन्ह्य़ात सासरच्या मंडळींना गुंतवणे अयोग्य Print

सर्वोच्च न्यायालयाचे मत
पीटीआय, नवी दिल्ली

हुंडाप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्य़ात सासरच्या मंडळींची नावे प्राथमिक माहिती अहवालात नोंदली गेली असली तरी ठोस पुराव्याशिवाय त्यांना त्या गुन्ह्य़ात अडकवणे योग्य होणार नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. याबाबत आपले मत मांडताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, कौटुंबिक वादात तक्रारदार महिलेच्या केवळ तक्रारीवरून सासरच्या मंडळींना त्या गुन्ह्य़ात अडकवणे योग्य नसून न्यायालयांनीदेखील सर्व बाबी तपासूनच कारवाई करावी. कौटुंबिक वाद प्रकरणी प्राथमिक माहिती अहवालात  केलेले आरोप निश्चित स्वरूपाचे नसतील तर ते योग्य नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.