वीजप्रश्नी तामिळनाडूत औद्योगिक बंद Print

कोइम्बतूर :
जवळपास १२ ते १४ तास वीज नसल्याच्या निषेधार्थ येथील २० हजारांहून अधिक छोटय़ा आणि मध्यम उद्योगसमूहांनी शनिवारी बंद पुकारला होता. तामिळनाडू सरकारने दररोज किमान आठ तास सलग विजेचा पुरवठा करावा, अशी मागणी कोइम्बतूर औद्योगिक संघटना महासंघाने राज्य सरकारकडे केली आहे. विजेचा अपुरा पुरवठा आणि त्यामध्ये सातत्याने पडणारा खंड याच्या निषेधार्थ २० विविध संघटनांनी पुकारलेल्या बंदमुळे १५० कोटी रुपयांहून अधिक उत्पादनाचा तोटा सहन करावा लागल्याचे महासंघाने म्हटले आहे. मुख्यमंत्री जयललिता यांना याबाबत पंतप्रधानांची प्रत्यक्ष भेट घ्यावी आणि त्यांच्याकडे किमान दोन हजार मेगाव्ॉटची मागणी करावी असे निवेदन महासंघाने दिले आहे.