ओदिशात सरपंचाची गळा चिरून हत्या Print

पीटीआय
मलकानगिरी (ओदिशा)
आपल्या आदेशांचे पालन न केल्याने संतप्त झालेल्या माओवाद्यांनी मलकानगिरी जिल्ह्यातील एका सरपंचाची शुक्रवारी रात्री गळा चिरून हत्या केली.
परसनपल्ली गावचे सरपंच पांडू मदकर्णी (५०) हे घरात झोपलेले असताना जवळपास ५० सशस्त्र माओवाद्यांनी त्यांना उचलून नेले आणि त्यांची गळा चिरून हत्या केली. गावातील अन्य काही जणांनाही १७ ऑक्टोबर रोजी माओवाद्यांनी ‘कांगारू कोर्टा’त बोलाविले आणि त्यांना समज देऊन दुसऱ्या दिवशी सोडून दिले, असे पोलिसांनी सांगितले. मदकर्णी पोलिसांचे खबरे असल्याचा माओवाद्यांना संशय होता आणि हे प्रकार थांबवावेत, अशी धमकी त्यांना देण्यात आली होती.