इराकमधील हल्ल्यात १० ठार, २० जखमी Print

पीटीआय
बगदाद
बगदादजवळ आणि इराकच्या उत्तरेकडील भागात असलेल्या शहरात शिया पंथीय यात्रेकरूंवर करण्यात आलेल्या हल्ल्यात शनिवारी किमान १०जण ठार झाल्याचे वृत्त आहे. ईदचा सण साजरा करीत असतानाच हा हल्ला चढविण्यात आला आहे.
इराकमध्ये गेल्या आठवडय़ातही गोळीबार आणि बॉम्बहल्ले करण्यात आले होते. त्यामध्ये २०जण जखमी झाले. त्यामुळे या भागात अशांतता पसरली आहे. येथून २५ कि.मी. अंतरावर असलेल्या ताजी शहरात शिया यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसला लोहचुंबकाच्या साहाय्याने बॉम्ब लावण्यात आला होता. त्याच्या स्फोटात किमान पाचजण ठार झाले, असे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. इराकमधील शिया यात्रेकरू ईदचा सण चार दिवस साजरा करतात. त्या वेळीच हे हल्ले चढविण्यात आले.