दिल्लीमध्ये २२ डिसेंबर नंतर प्लास्टिक बॅगवर बंदी Print

नवी दिल्ली, २९ ऑक्टोबर २०१२
दिल्लीमध्ये २२ डिसेंबर नंतर प्लास्टिक बॅग तयार करण्यावर बंदी घालण्यात आली असून त्या विकतासुध्दा येणार नाहीत. एवढंच नव्हे तर त्यांचा साठाही करता येणार नाही. प्लास्टिक बॅगच्या वापरावर पूर्णपणे आळा घालण्यासाठी दिल्ली सरकारने २२ डिसेंबर पर्यंत शेवटची मुदत दिली आहे.    
प्लास्टिक बॅग तयार करणा-या आणि विकणा-या व्यावसायिकांना पर्यावरण विभागाच्या अधिका-यांनी त्याचे उत्पादन ताबडतोब बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.