खाप पंचायतींना हवी आहे रात्री होणा-या लग्नांवर बंदी Print

alt

रोहतक, २९ ऑक्टोबर २०१२
काल (रविवार) झालेल्या खाप पंचायतीच्या बैठकीत हरियानातील रात्री होणा-या लग्नांवर बंदी घालणायचा निर्णय घेण्यात आला. पंचायतीतर्फे अशी मागणी सरकारकडे करण्यात येणार आहे. खाप पंचायतीने यापूर्वी बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी मुलींच्या लग्नाचे वय कमी करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावर सर्वसंमती झाली नव्हती.
रात्री होणा-या लग्नांमुळे मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात घडतात. तसेच मद्यप्राशन केलेल्या लोकांमुळे अनेक वाद-विवाद होतात. हे सर्व टाळण्यासाठी खाप पंचायतीने ही मागणी केली आहे. या बैठकीला एकूण ५० खाप पंचायतीमधील २०० सदस्य उपस्थित होते.
रात्री होणाऱ्या लग्नांवर बंदी घातल्यास अपघातांच्या घटना कमी होतील, असं रोहतक येथील खाप-८४ चे अध्यक्ष हरदीप सिंह यांनी सांगितले.
आमचे प्रतिनिधी मंडळ लवकरच मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांची भेट घेणार असल्याचे धनकर खाप पंचायतीचे अध्यक्ष ओम प्रकाश यांनी म्हटले आहे. राज्यांतील सर्व खाप पंचायती आपल्या भागामध्ये रात्री लग्न न लावण्याबाबत प्रचार नागरिकांमध्ये प्रचार करणार आहेत.