भारतीय पथकाला पाकची परवानगी Print

पीटीआय, नवी दिल्ली
मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी भारताच्या राष्ट्रीय अन्वेषण विभागाच्या (एनआयए) अधिकाऱ्यांना आपल्या देशात तपास करू देण्याबाबत पाकिस्तानने तत्त्वत: मान्यता दिली आहे. या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानात नेमके केव्हा यावे, याबाबत मात्र त्यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे सोमवारी ही माहिती देण्यात आली.  
मुंबई हल्ल्याप्रकरणी तपासात खूपच प्रगती झाली आहे. मात्र या प्रकरणी अटक झालेला लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या झाकीर रहेमान लखवी व सहा अतिरेक्यांविरुद्ध रावळपिंडी न्यायालयात अद्यापही खटला उभा राहिलेला नाही. या हल्ल्यामागे पाकिस्तानी अतिरेक्यांचा हात आहे, यासाठी पुरेसे पुरावे असून पाकिस्तानात जाऊन त्यांची शहानिशा करण्याची भारताची मागणी पाकिस्तानने धुडकावली होती, आता मात्र तशी मान्यता दिली गेल्याचे सांगण्यात आले.