केटची ‘ती’ छायाचित्रे काढणारा सापडला Print

वृत्तसंस्था, लंडन
डचेस ऑफ केंब्रिज व ब्रिटनची राजस्नुषा केट मिडलटन हिची टॉपलेस छायाचित्रे काढणाऱ्या पापाराझी छायाचित्रकाराचे नाव पोलिसांना समजले असून त्याला लवकरच अटक केली जाईल, असे फ्रान्सच्या पोलिसांनी सांगितले.
‘क्लोजर’ या नियतकालिकाने केट मिडलटन व युवराज विल्यम्स हे एका खासगी विश्रामगृहावर उतरले असता त्यांची खासगी छायाचित्रे टिपली होती.ती प्रसिद्ध होताच खळबळ उडाली होती.