भयपटामुळे कॅलरीघट वेगाने Print

वृत्तसंस्था, लंडन

कॅलरी जाळण्यासाठी आसुसलेल्यांसाठी नवा उपाय शोधला गेला आहे तो म्हणजे भयपट पाहण्याचा! अर्धा तास चालून जेवढी कॅलरी खर्च होते तेवढीच काहीवेळ भयपट पाहूनदेखील होते. दीड तास भयपट पाहून ११३ कॅलरी खर्च होते, असे सिद्ध झाले आहे. वेस्टमिनिस्टर विद्यापीठाने भयपट पाहाणाऱ्या लोकांच्या केलेल्या सखोल अभ्यासातून हे निष्कर्ष काढले आहेत. या लोकांच्या हृदयाचे ठोके, नाडीचे ठोके, रक्ताभिसरण आणि श्वासोच्छवासाची गती यांचाही अभ्यास केला गेला. भयपटात लोकांना धक्का देणाऱ्या प्रसंगात प्रेक्षकाच्या हृदयाचे ठोके अतिशय जलद पडतात आणि कॅलरी सर्वाधिक जाळतात, असेही दिसून आले.
सर्वाधिक कॅलरीखाऊ भयपटांच्या यादीत १९८० सालचा ‘द शायनिंग’ हा सायकॉलॉजिकल थ्रीलर म्हणून गणला गेलेला भयपट आहे. तो पाहून तब्बल १८४ कॅलरी खर्च झाल्याचे या अभ्यासात आढळले. त्याखालोखाल ‘जॉज्’ चित्रपटाने १६१ कॅलरी जाळल्या. ‘द एक्झॉर्सिस्ट’ हा भयपट १५८ कॅलरी जाळून तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.    
टॉप टेन भयपट!
द शायनिंग (१८४ कॅलरी)
जॉज् (१६१) द एक्झॉर्सिस्ट (१५८) सॉ (१३३) अ नाइटमेअर ऑन एल्म स्ट्रीट (११८) पॅरॅनॉर्मल अ‍ॅक्टिव्हिटी (१११) द ब्लेअर विच प्रोजेक्ट (१०५) द टेक्सास चेन सॉ मॅसॅकेअर (१०७) रेक (१०१)