रेल्वे पुन्हा भाडेवाढीच्या पावित्र्यात Print

 

विशेष प्रतिनिधी , नवी दिल्ली
नवे रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी सोमवारी आपल्या खात्याची सूत्रे स्वीकारताच रेल्वे सेवासुविधांमध्ये सुधारणांच्या नावाखाली प्रवासी भाडेवाढीचे संकेत दिले. रेल्वे प्रवाशांना चांगल्या सुविधा प्रदान करण्यासाठी प्रवासी भाडय़ात वाढ करण्यात येईल, असे बन्सल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


सध्या रेल्वे खाते वित्तीय संकटाशी झुंजत आहे आणि अनेक रेल्वे प्रकल्पांच्या खर्चात कपात करावी लागत आहे. रेल्वेचा व्यापक डोलारा सांभाळण्यासाठी आम्हाला भाडेवाढ करावी लागेल आणि रेल्वे सुविधांमध्ये सुधारणा करणार असल्याने या भाडेवाढीचे प्रवासीही स्वागत करतील, असा विश्वास बन्सल यांनी व्यक्त केला. प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वेगाडय़ांमध्ये स्वच्छतेवर बन्सल यांनी भर दिला आहे.