काझीरंगातील शिकारी जेरबंद Print

पीटीआय, दिफू (आसाम)
एकशिंगी गेंडय़ांच्या बेकायदा शिकार प्रकरणात चंद्रा डोले आणि गणेश डोले या दोन शिकाऱ्यांना अटक करण्यात आली आह़े  ते शरणागत अतिरेक्यांच्या टोळीसोबत काम करीत होत़े  तसेच, काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील अनेक प्राण्यांच्या बेकायदा शिकारींमागेही त्यांचा हात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आह़े
गेंडे जिवंत असतानाच ही टोळी त्यांची शिंगे उपटून काढत अस़े  त्यात जखमी गेंडय़ांचा कित्येक दिवस तडफडून मृत्यू होत अस़े  पुढे  त्यांच्या गुन्हेगारी जगतातील जाळ्याच्या माध्यमातून या शिंगांची नागालँडमधील दिमापूरमार्गे मध्य-पूर्व आशियात तस्करी होत असे.