सोनिया गांधी भाजपवर बरसल्या Print

पीटीआय, शिमला
स्वत:च्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना, त्यावर कोणतीही कारवाई न करण्याचा दुटप्पीपणा भाजप करीत आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी येथे केली. स्वत:च्या नेत्यांवर कोणती कारवाई केली, याचे उत्तर भाजपला जनतेला द्यावेच लागेल, असेही त्यांनी ठणकावल़े
हिमाचल प्रदेशात निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत सोनिया गांधी यांनी रिदगे मैदानातील सभेत त्या बोलत होत्या. काँग्रेस हा भ्रष्ट नेत्यांविरुद्ध कडक कारवाई करणारा एकमेव पक्ष असून भ्रष्टाचार उघड करण्यासाठीचे प्रभावी शस्त्र ठरलेला माहिती अधिकार कायदाही काँग्रेसच्याच राजवटीतच अस्तित्वात आला, असे त्या म्हणाल्या.