थरुरांनी मोदींना सुनावले पत्नीचे मोल! Print

पीटीआय, नवी दिल्ली
केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी पत्नी सुनंदा पुष्कर यांच्याबाबत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा मंगळवारी समाचार घेतला. माझी पत्नी अनमोल आहे. मात्र नरेंद्र मोदींना प्रेम-भावना समजून घेण्याची अधिक गरज असल्याचे थरूर यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
थरूर यांना पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात घेतल्याबद्दल बोलताना मोदी यांनी सुनंदा पुष्कर यांचे प्रेम ५० कोटींचे असल्याचे विधान केले होते. २०१० मध्ये आयपीएल क्रिकेट स्पर्धेदरम्यान सुनंदा पुष्कर यांच्या आíथक गुंतवणुकीच्या वादातून थरूर यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. आता पुन्हा मंत्रिपदी नेमणूक झाल्यामुळे मोदींनी त्यांच्यावर टीका केली आहे.