राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून इंदिरा गांधींना श्रद्धांजली Print

alt

नवी दिल्ली, ३१ ऑक्टोबर २०१२
भारचाच्या पहिल्या महिला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या २८ व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज (बुधवार) त्यांची समाधी 'शक्तीस्थळ' येथे जाऊन श्रद्धांजली वाहिली.
दिल्लीताल विविध पक्षांच्या अनेक बड्या नेत्यांनी 'शक्तीस्थळ' येथे जाऊन पूष्प अर्पण करून इंदिरा गांधींना श्रद्धांजली वाहिली. लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी, राज्यपाल तेजिंदर खन्ना, केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, सलमान खुर्शिद, वीरप्पा मोईली, कमलनाथ, पी. के. बन्सल आणि नारायण सामी यांनी इंदिरा गांधींना श्रद्धांजली वाहिली. तसेच नव्याने मंत्रिमंडळात सहभागी झालेले दीपादास मुन्शी आणि चिरंजीवीही यावेळी उपस्थित होते.
३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या करण्यात आली होती. १९१७ मध्ये अलाहाबाद येथे पं. जवाहरलाल नेहरू आणि कमला नेहरू यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. सारे घराणेच भारतीय स्वातंत्र्यलढय़ात सहभागी असल्याने देशभक्तीचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. वयाच्या १२व्या वर्षी त्यांनी वानरसेना स्थापून इंग्रजांविरुद्ध लढा देण्यास सुरुवात केली. शांतिनिकेतन, पुणे, इंग्लंड, स्वित्र्झलड येथे शिक्षण. १९४२ मध्ये लढाऊ काँग्रेस कार्यकर्ते फिरोज गांधी यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताच्या उभारणीत भरीव योगदान. केंद्रीय सामाजिक न्याय आयोग, कँाग्रेस कार्यकारिणी सदस्य, युवक काँग्रेस अध्यक्ष, काँग्रेसचे अध्यक्षपद, माहिती व नभोवाणी मंत्री, पंतप्रधानपद अशी पदे त्यांनी भूषविली व त्यावर स्वत:चा ठसा उमटविला. १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण, १९७१ च्या युद्धात पाकिस्तानचा पराभव, बांगलादेश निर्मिती, भारताचा पहिला अणुस्फोट, ब्ल्यू स्टार ऑपरेशन, वीस कलमी कार्यक्रम यांमुळे त्यांची कारकीर्द वादळी ठरली.