मोदी व्हिसासाठी अर्ज करू शकतात - अमेरिका Print

पी.टी.आय, ३१ आँक्टोबर २०१२

गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगलींनंतर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा व्हिसा अमेरिकेने नाकारला होता मात्र, नरेंद्र मोदी व्हिसासाठी अर्ज करू शकतात आणि व्यवस्था त्यावर योग्य निर्णय घेईल असं अमेरिकेने काल (मंगळवार) स्पष्ट केले.अमेरिकेच्या दक्षिण-मध्य विभागातील राज्यांचे सचिव राँबर्ट ब्लेक यांनी गुजरात राज्याबरोबर अमेरिकेचे चांगले संबंध असून गुजरात राज्य अमेरीकन संस्थांच्या दृष्टीने महत्वाचे आहे, असे स्पष्ट केले. मोदींची यावर काय प्रतिक्रिया असेल याबद्दल आता कोणताही अंदाज मला व्यक्त करावयाचा नाही पण मोदी केव्हाही नव्या व्हिसासाठी अर्ज करू शकतात,  असंही ते पुढे म्हणाले.
याआधी अमेरिकेने नरेंद्र मोदी यांचा व्हिसा नाकारला गेला होता. गेल्याच आठवड्यात मोदींनी इग्लंडच्या अधिका-यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर अमेरिकासुद्धा त्याच मार्गाने पुढे जात मोदींवर घालण्यात आलेली बंदी हटवण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.