२००९ मधील विमान अपहरण प्रकरणा संबंधीत आरोपीला आजीवन कारावासाची शिक्षा Print

alt

नवी दिल्ली, ३१ आँक्टोबर २०१२
फेब्रुवारी २००९ मध्ये इंडिगो हवाईवाहतूक संस्थेच्या गोवा-दिल्ली विमानात टोकधार वस्तू(सुया) आणि बंदुकीसकट अटक झालेल्या आणि व्यवसायाने चार्टड अकाऊन्टंट असलेल्या आरोपीला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जितेंदर कुमार मोहला याला कलम ३(१)(डी) अंतर्गत हवाई सुरक्षा कायदेविरोधक कृत्य केल्याने आजीवन कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे, असे जिल्हा न्यायाधीश आय.एस.मेहता यांनी स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे मोहलाला कलम ३३६(प्राणघातक प्रयत्न), ५०६(गुन्हा प्रयत्न) आणि १७० (सार्वजनिक कर्मचा-यांची फसवणूक) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच न्यायालयाकडून ७००० रूपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. पोलिसांच्या मते मोहला याने १ फेब्रुवारी २००९ रोजी विमानाच्या काँकपीट मध्ये घुसून विमान अपहरणाचा प्रयत्न केला होता. त्यानंतर काही प्रवाशांच्या मदतीने मोहला याला अडवणूक करून दुस-या दिवशी अटक करण्यात आली होती.
मोहलाने इंडीगो विमानच्या चालकाला अपहरणाचा संदेश पाठविण्यासाठी सांगत विमान इंदिरा गांधी आंतराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने नेण्यासाठी भाग पाड़ले होते त्यामुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते, असं पोलिसांनी पुढे स्पष्ट केले.
दहशतवादी कायद्यानुसार सदर कृत्य हे विमानातील १६० प्रवासी आणि विमान कर्मचा-यांच्या सुरक्षेविरोधी असल्याची मोहला याला जाणीव असल्याचेही बोलले जात आहे.
मोहला याला फेब्रुवारी २००९ ला अटक केल्यापासून त्याची न्यायालयीन चौकशी केली जात होती तसेच दिल्ली उच्चन्यायालयाने त्याच्या सुटकेचा अर्जा फेटाळून लावला होता यावर सर्वोच्च न्यायालयात मोहलाने दाद मागितली असता सर्वोच्च न्यायालयानेही अर्ज फेटाळून लावला.