मोदींना ‘दुसऱ्या’ दिवाळीचीही खात्री Print

वृत्तसंस्था, गांधीनगर
पारंपरिक दिवाळी नोव्हेंबरमध्ये साजरी होईलच पण गुजरात निवडणुकीचे निकाल २० डिसेंबरला जाहीर होतील तेव्हा आमच्या विजयाने जी दिवाळी साजरी होईल ती ‘न भूतो न भविष्यति’ अशीच असेल, असे प्रतिपादन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले.
गुजरात विधानसभेसाठी १३ आणि १७ डिसेंबरला मतदान आहे. मतमोजणी २० डिसेंबरला होईल. या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त भारतीय जनता युवा मोच्र्याच्या ‘विजय प्रयाण यात्रे’चा शुभारंभ करताना ते बोलत होते. सलमान खुर्शीद यांच्यावर आरोप सुरू होऊन तीन दिवस उलटले नाहीत तोच त्यांचा तोल गेला आणि पारा सुटला. कार्यकर्त्यांना थेट धमकावण्यापर्यंत त्यांची मजल गेली. या पाश्र्वभूमीवर माझ्यावर पूर्ण ताकदीनिशी इतके आरोप गेली १२ वर्षे होत आहेत तरीही मी अढळ आहे, याचे विरोधकांनाही आश्चर्य वाटते, असे ते म्हणाले.